चलनातील नोटा 17 टक्क्यांनी वाढल्या
नवी दिल्ली : देशाची आर्थिक व्यवस्था ही डबघाईला आल्याने सर्व स्तरातून सरकारवर टीका होताना दिसत आहे. त्यातच आता देशात डिजीटल पेमेंटच्या वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहेत परंतू, सरकारचा हा प्रयत्नदेखील फसला असल्याचे दिसत आहे. कारण आता देशातील चलनी नोटांचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या 2019 च्या वार्षिक अहवालात याविषयी माहिती देण्यात आली आहे.
आरबीआयच्या अहवालातील माहितीनुसार, चलनी नोटांच्या वाढीनंतर मार्च 2019 अखेरीस चलनात 21.10 लाख कोटी रूपये मुल्याच्या नोटा होत्या असे सांगण्यात येत आहे. चलनातील नोटांची संख्या ही 6.2 टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष 2019 च्या अखेरीस चलनात 108759 दशलक्ष नोटा होता. तसेच या चलनात 500 रुपयांच्या नोटांना जास्त मागणी असल्याचेही सांगण्यात आले आहे.