मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची जोडी हे कॉम्बिनेशन असलेला “जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट येत्या 10 फेब्रुवारीला सिनेरसिकांच्या भेटला येणार आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती.
दरम्यान, अश्यातच या चित्रपटातील ‘येतोय भावी आमदार..’ हे नवीन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय अतुलचं धमाकेदार म्युझिक या गाण्यात ऐकायला मिळत आहे. तसेच, यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि अमेय वाघचा भन्नाट डान्स दिसून येत आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून, प्रेक्षकांचा गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
यापूर्वी जग्गू आणि जुलिएटमधील ‘मना तुझ्या विना.!’ या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता ‘येतोय भावी आमदार’ या गाण्यावर थिरकायला प्रेक्षक सज्ज झाले आहेत. ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ही लव्हस्टोरी 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.