पुणे – ‘‘सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख परत निर्माण करण्याचा याच बरोबर दैनंदिन जीवनांत सायकलचा वापर वाढला पाहिजे, यासाठी “आपलं पुणे सायक्लोथॉन” या स्पर्धेचे अयोजन करण्यात आलं आहे. यंदा ही स्पर्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असून हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असणार आहे. ही स्पर्धा पुनीत बालन ग्रुप “आपलं पुणे सायक्लोथॉन” यांच्या पुढाकाराने होत आहे,
या स्पर्धेची पुणेकरांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी “सेलिब्रिटी प्रोमो राईडचे” आज आयोजन करण्यात आले होते. ऍग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड पासून या रॅलीची सुरुवात झाली. मराठी अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या उपस्थितीमध्ये प्रोमो राईडला सुरुवात करण्यात आली.
या प्रोमो राईडमध्ये पुनीत बालन, कृष्ण प्रकाश, रवींद्र वाणी, प्रविण तरडे, अमेय वाघ, वैदेही परशुरामी, महेश लिमये, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, विनोद सातव, जयेश संघवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी झाले होते. या स्पर्धेची सुरुवात आणि सांगता ऍग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड येथे झाली.