मुंबई – पुनित बालन स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपट सुपरहिट ठरल्याने या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटात वैदेही परशुरामी आणि अमेय वाघची भन्नाट केमिस्ट्रीने तरुणाईला अक्षरशः वेडं केलं आहे. अशात व्हॅलेंटाईन डेचा स्पेशल मुहूर्त साधत जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील ‘तू बी अन् मी बी’ हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आलं आहे.
तू बी अन् मी बी हे गाणं राहुल संजिर यांनी कोरिओग्राफ केलं असून गुरु ठाकूर यांनी लिहिले आहे. तर अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. अमेय आणि वैदेहीची प्रेमात पाडणारी अदा यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तरुणाईला विशेष भुरळ पाडल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. सध्या सोशल मीडियासह थिएटरमध्ये केवळ जग्गू आणि जुलिएटचाच बोलबाला पाहायला मिळतोय.
‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत. त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. या चित्रपटामुळे अमेय-वैदेही ही जोडी ‘झोंबिवली’ या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसली.त्यामुळे चित्रपट थिएटर्समध्ये दाखल होताच तरुणाईची गर्दी झाली.
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन. तसेच अमेय -वैदेहीची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपट सध्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल चित्रपट ठरतोय.