सिंहगड घाटात धोकादायक दरडी काढण्यास सुरुवात
खडकवासला – सिंहगड किल्ल्याचा घाट रस्त्यावर चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सिंहगडावर जाणारे – येणारे नागरिक व पर्यटकांना अडथळे येऊ नयेत. यासाठी वन विभागाकडून धोकादायक दरडी, दरडीचा मलबा व लहान दगड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सांगितले.
डोंगर उतारावरून छोटे दगड, गोटे, खाली येत आहेत. ते रस्यावर आल्यास सुरक्षारक्षक, पर्यटकांच्या वाहतुकीला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. सिंहगड घाट रस्त्यावर पावसामुळे रस्त्यात आलेले दगड, माती ताबडतोब काढण्यात येत आहेत.अलीकडेच कल्याण दरवाजाची तटबंदी पडली होती. परंतु त्या व्यतिरिक्त सिंहगड घाटामध्ये कोणत्याही ठिकाणी दरड कोसळलेली नाही. परंतु यासाठी वन प्रशासन दक्ष झाले आहे.
सोमवारी (दि. 11) सिंहगडावर 271 चारचाकी वाहने तसेच 626 दुचाकी वाहने सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या होत्या. याठिकाणी नेमलेले सुरक्षारक्षक वॉकीटॉकी वरून एकमेकांच्या संपर्कात असतात. घटना घडली की ते त्वरीत एकमेकांना व वरिष्ठांना कळवतात.