नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
देशात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर, राज्यात मात्र आज ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पावसाची शक्यता नाही.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, त्रिपुरा किनारपट्टी भागातील कमी दाबाचे क्षेत्र रविवारच्या आयएसटी 1730 तासांवर कमी चिन्हांकित झाले आहे. चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून 1.5 किमी अंतरावर आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात असलेल्या या चक्रीवादळामुळे देशातील हवामानवर परिणाम होणार आहे. त्यामुळे, नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 रोजी आंध्र प्रदेश आणि 22 नोव्हेंबर 2023 रोजी तामिळनाडू किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
18 ते 22 नोव्हेंबर 2023 दरम्यान वरील प्रदेशात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह, अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
तसेच, 20 नोव्हेंबरला आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात दाट धुक्याची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्याचा पारा आणखी घसरणार
महाराष्ट्रात सोमवारी पावसाचा अंदाज नाही, पण पारा घसरणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य भागात त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. मुंबई पुण्यात पुढील 24 तासांत किमान तापमानात किंचित घट होईल,
असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. त्यासोबतच नागपूर अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर या भागातही सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा जोर वाढणार असून दुपारी आकाश स्वच्छ असेल.