World Cup 2023 Final India vs Australia Live Score Updates in Marathi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 240 धावांच्या आधीच रोखलं आहे. भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 240 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 रन्सचं टार्गेट मिळालं आहे.
IND vs AUS Live Score : पावरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाला तीन धक्के..
विजयासाठी 241 धावांचां पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या पावर प्लेमध्ये(10 षटक) 3 बाद 60 धावा झालेल्या आहेत. मार्नस लॅबुशेन आताचा क्रिजवर आला आहे तर ट्रॅव्हिस हेड 19*(26) धावांवर नाबाद क्रीजवर आहे.
CWC23 FINAL. 9.4: Mohammad Shami to Travis Head 4 runs, Australia 59/3 https://t.co/5ieqhKIB0n #INDvAUS #CWC23 #Final
— BCCI (@BCCI) November 19, 2023
Third Wicket : स्मिथ परतला पॅव्हेलियनमध्ये…
जसप्रीत बुमराहने भारताला तिसरे यश मिळवून दिले. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने स्टीव्ह स्मिथला बाद केले. नऊ चेंडूत चार धावा केल्यानंतर स्मिथ एलबीडब्ल्यू (LBW) बाद झाला.
Second Wicket : शमीनंतर बुमराहने घेतली विकेट…
जसप्रीत बुमराहने भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे. त्याने पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शला बाद केले. मार्श 15 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. मार्श बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ क्रीझवर आला आहे.
First Wicket : दुसऱ्याच षटकात वॉर्नर बाद…
विजयासाठी 241 धावांचां पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने बसला आहे. मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले. तीन चेंडूत सात धावा करून वॉर्नर बाद झाला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 240 धावांच्या आधीच रोखलं. भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 240 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून केएल राहुल यानं 107 चेंडूत एका चौकारासह 66 धावांची खेळी केली. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. रोहित 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा करून बाद झाला. सूर्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या. भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.