प्रभास नव्हे…कन्नड चित्रपट निर्मात्याशी अनुष्का शेट्टी करणार ‘लग्न’ ?

‘बाहुबलीच्या देवसेना’ अर्थात अनुष्का शेट्टीबद्दल आलेली बातमी चाहत्यांना धक्का बसू शकते. विशेषत: जे चाहते प्रभाससोबत तिच्या लग्नाचे स्वप्न पाहत आहेत. अनुष्का शेट्टी अभिनेता प्रभाससोबत नव्हे तर कन्नड चित्रपट निर्मात्याशी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहे..
एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘अनुष्का शेट्टीने निर्मात्याशी लग्न करणार आहे. लग्न या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. ही बातमी प्रभास-अनुष्काच्या चाहत्यांची मनं खच्ची करणार आहे. ज्या प्रोड्यूसरसोबत अनुष्का लग्न करणार आहे ते 42 वर्षांचे आहे आणि अनुष्का शेट्टी देखील 42 वर्षांची आहे.
प्रभास आणि अनुष्काबद्दल बोलायचे झाले तर या दोघींना तेलुगू सिनेमातील हिट जोडी मानले जाते. या जोडीला खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहण्याची चाहत्यांना नेहमीच इच्छा होती. पण अनुष्का नेहमी प्रभासला मित्र म्हणायची.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अनुष्का शेट्टीने प्रभाससोबतच्या अफेअरच्या बातमीवर म्हटलं होतं, ‘प्रभास माझा असा मित्र आहे, ज्याला मी पहाटे ३ वाजताही कॉल करू शकते. आमची नावे अनेकदा एकमेकांशी जोडली जातात कारण आम्ही विवाहित नाही, आणि ऑनस्क्रीन आमची केमेस्ट्री लोकांना आवडते. आमच्यात असं काही झालं असतं तर ते आत्तापर्यंत बाहेर आलं असतं’ असं म्हणत तिने अनेकदा या चर्चांवर मौन तोडले आहे. मात्र आता अनुष्काचे नाव निर्मात्याशी जोडल्यामुळे पुन्हा एकदा चर्चां उधाण आले आहे.
हे वाचाल का ? अनिल कपूरने ‘हाऊसफुल 5’ नाकारला





