रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : देशात रेल्वेचे जाळे एवढ्या वेगाने विस्तारत असताना आता देशातील नागरिकांना आता एक रोमांचकारी अनुभव घेता येणार आहे. हा अनुभव नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. कारण देशात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेल्वे लवकरच धावणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती देत यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर केला आहे.
भारत की पहली अंडर वॉटर ट्रेन शीघ्र ही कोलकाता में हुगली नदी के नीचे चलना आरंभ होगी। उत्कृष्ट इंजीनियरिंग का उदाहरण यह ट्रेन देश में निरंतर हो रही रेलवे की प्रगति का प्रतीक है।
इसके बनने से कोलकाता निवासियों को सुविधा, और देश को गर्व का अनुभव होगा। pic.twitter.com/MDzj42s5XZ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 8, 2019
देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार असल्याचे या व्हिडीओमधून सांगण्यात आले. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोलकात्यातील प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही ट्रेन लवकरच सुरू होणार असून हे उत्तम इंजिनिअरिंगचे प्रतिक असल्याचे पीयूष गोयल म्हणाले.