नवी दिल्ली : एफआयएच (#FIH) प्रो-लीग हाॅकी स्पर्धेतील आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या लढतीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपविण्यात आले आहे. तर, हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर भारत-आॅस्ट्रेलियादरम्यान २१ आणि २२ फेब्रुवारीदरम्यान या लढती होतील. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानी तर आॅस्ट्रेलियाचा संघ दुस-या स्थानी आहे.
दरम्यान, मागील दोन एफआयएच लढतीत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या बेल्जियमचा २-१ ने पराभव केला होता. मात्र, दुस-या सामन्यात भारताला बेल्जियमकडून ३-२ ने पराभव स्विकारावा लागला होता.
🚨 SQUAD ANNOUNCEMENT 🚨
The #FIHProLeague 24-member squad for Indian Men's Hockey Team's fixture against the @Kookaburras is finally out! 😎
Wish them luck ahead of the big match! 👇#IndiaKaGame #INDvAUS #HockeyInvites #HockeyAtItsBest pic.twitter.com/bxVejcTEa3
— Hockey India (@TheHockeyIndia) February 18, 2020
भारतीय संघ पुढीलप्रमाणे : पी आर श्रीजेश, के बी पाठक, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, बीरेंद्र लाकड़ा, हरमनप्रीत सिंग (उप कर्णधार), वरूण कुमार, गुरिंदर सिंग, रूपिंदर पाल सिंग, मनप्रीत सिंग (कर्णधार), विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, चिंगलेनसाना सिंग, राज कुमार पाल, आकाशदीप सिंग, सुमित, ललित उपाध्याय, गुरसाहिबजीत सिंग, दिलप्रीत सिंग, एसवी सुनील, जरमनप्रीत सिंग, सिमरनजीत सिंग, नीलाकांता शर्मा, रमनदीप सिंग.