Paris 2024 Olympics – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २७ जुलै रोजी भारतीय पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेचा कार्यक्रम बुधवारी येथे प्रसिद्ध झाला. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताला ब गटामध्ये स्थान देण्यात आले आहे.
२७ जुलैला न्यूझीलंडशी सामना केल्यानंतर भारत २९ जुलैला अर्जेंटिना, ३० जुलैला आयर्लंड, १ ऑगस्टला बेल्जियम आणि २ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. नेदरलँड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेला अ गटामध्ये स्थान मिळाले आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने ४ ऑगस्टला तर उपांत्य फेरीचे सामने ६ ऑगस्टला होतील. कांस्य पदकाची प्ले-ऑफ आणि फायनल ८ ऑगस्टला होणार आहे.
French Open Badminton 2024 : श्रीकांतचा शानदार विजय, प्रणोयचे मात्र आव्हान संपुष्टात…
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाख आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी उपस्थित होते. हे सामने कोलंबसच्या यवेस-डु-मेनॉयर स्टेडियमवर खेळवले जातील. पुरुष गटात बेल्जियम हा गतविजेता आहे.