केंदूर- करंदी (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील तरुण हेमंत आबासाहेब ढोकले यांची 2019 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करीत तहसीलदारपदी निवड झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी आबासाहेब ढोकले यांच्या मुलाने आठ वर्षांत तब्बल चार महत्त्वाच्या पदासाठी तयारी करीत एकापाठोपाठ एक पद मिळवल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहेत.
यावेळी करंदी, केंदूर, शिक्रापूर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, कोरेगाव, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे परिसरातील ग्रामस्थांनी यांचा सन्मान केला आहे. ढोकले यांनी 2011 त्यानंतर 2017 मध्ये सहायक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती घेतली होती.
दरम्यान, ऑक्टोबर 2017 ते लोणंद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पुन्हा 2019 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकापाठोपाठ चार महत्त्वाच्या पदे मिळविली आहेत. यानंतर आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.
अठराविश्व दारिद्रय असलेल्या अल्पभूधारक शेतकरी आबासाहेब ढोकले यांचा मुलगा हेमंत ढोकले यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण करंदीत घेतले. त्यानंतर पुढे त्यांनी पुणे येथे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. त्यांच्या पत्नीने कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.