डोर्लेवाडी : पाहुण्याच्या लग्नाला जाणं डोर्लेवाडीतील एका कुटुंबाला महागात पडल आहे. १४ तारखेला अहमदनगरला जवळच्या पाहुण्याच्या लग्नाला गेलेल्या कुटुंबापैकी एका ६४ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे डोर्लेवाडीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार प्रशासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आले आहेत.
डोर्लेवाडीला लागून असलेल्या मेखळीत देखील कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. झारगडवाडीत देखील खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोना आता आपल्या गावात पोहोचला आहे. गाव कोरोना विषाणू प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गावात गर्दी करणे, विना मास्क फिरणे, सार्वजनिक कार्यक्रम करणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने आपल्या गावात उद्या पंचमीचा तसेच परवा होणारा सकरोबा व शिराळशेठ चा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सदर सार्वजनिक कार्यक्रम करताना अथवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी केलेली आढळून आलेस त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी व आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यास सहकार्य करावे असे आव्हान डोर्लेवाडीचे सरपंच बाळासो सलवदे, ग्रामविकास अधिकारी सय्यद एस. इन, पोलीस पाटील नवनाथ मदने यांनी केले आहे..