आळंदी -येथील श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या भाविकांच्या महापूजा बंद करून मुक्ताई मंडप येथे माउलींच्या चल पादुकां पूजनावर ब्रह्मवृंदांनी बहिष्कार घातला होता.
मात्र, आता भाविकांमधील दर्शन बारीत होणारी गैरसोय व दर्शनास होणारा विलंब याचा विचार करून देवस्थानच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत महापूजा मुक्ताई मंडपात करू असा निर्णय घेतल्याने सोमवार (दि. 30) पासून पूजा सुरळीत सुरू असल्याचे चित्र माउली मंदिरात दिसून येत आहे.
या निर्णयामुळे नागरिक, भाविकांनी अतिशय समाधान व्यक्त करून या निर्णयाचे स्वागत केले आहे, तसेच देवस्थानचे सर्व विश्वस्तांचे देखील आभार मानले आहेत.