पिंपरी, (प्रतिनिधी) – अंतिम फेरीत बरोबरी साधण्याचा गोल दीर्घकाळ लक्षात राहील. हरियाणाची गोलकीपर सविता हिला चकवल्याचा आनंद अवर्णनीय असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राची खेळाडू अक्षता ढेकळे या खेळाडूने केले. 14व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत अक्षताच्या गोलमुळे हॉकी महाराष्ट्राने दमदार पुनरागमन केले. या बाबत प्रतिकि्रया देताना अक्षता बोलत होती.
संघाने घेतलेल्या कठोर मेहनतीला मी हा गोल समर्पित करू इच्छितो. मी फक्त सांघिक कामगिरी उंचावण्यात थोडे योगदान दिले, असे अक्षताने प्रतिपादन केले.
अक्षता प्रतिक्रिया देताना म्हणाली की, हे आनंदाचे क्षण आहेत. हा गोल माझ्या कायम लक्षात राहील. सिनियर स्पर्धेतील माझा आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट गोल म्हणून दीर्घकाळ स्मरणात राहील. हॉकी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. विशेषत: अशा वेळी, जेव्हा प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
मात्र, तो गोल वगळता फायनलमध्ये सेलिब्रेट करण्याचे फार क्षण मिळाले नसल्याची खंतही व्यक्त केली. तसेच वैयक्तिक ओळख मिळवण्यासह त्याक्षणी अनेक चेहऱ्यांवर हसू आणणे, हे खरोखरच संस्मरणीय बनवते असे मत अक्षताने व्यक्त केले.