मेलबर्न – आंतरराष्ट्रीय महिला टेनिसमध्ये यशस्वी ठरलेलेली भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा अखेर मानाने निवृत्त झाली. केवळ मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या सानियाला भारताच्याच रोहन बोपण्णासह खेळताना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत सानियाने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला व या खेळाला अलविदा केला.
Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर
मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानियाला बोपण्णासह खेळताना 6-7, 6-2 असा पराभव पत्करावा लागला. यापूर्वी ती महिला दुहेरीतही बाहेर पडली होती. या पराभवामुळे सानियाचे विजेतेपदासह निवृत्त होण्याचे स्वप्न भंग झाले. मिश्र दुहेरीत तिला अंतिम फेरीत बोपण्णासह खेळताना ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या जोडीने 6-7, 6-2 असे पराभूत केले. या पराभवासह सानियाची जागतिक टेनिस कारकीर्द संपुष्टात आली.
— Sania Mirza (@MirzaSania) January 27, 2023
सानियाने तिच्या कारकिर्दीत तीन महिला दुहेरी ग्रॅंडस्लॅम आणि तीन मिश्र दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत. तर बोपण्णाने मिश्र दुहेरीचे एक ग्रॅंडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. भारतीय जोडीने उरुग्वे आणि एरियल बेहार आणि मकाटो निनोमिया या जपानी जोडीचा 6-4, 7-6 (11-9) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी सानिया आणि रोहन बोपण्णा जोडीने केवळ एक सेट गमावला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीला एका सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.