Womens U19 T20 WorldCup – दक्षिण आफ्रिकेत सध्या १९ वर्षाखालील महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताच्या महिला संघाने न्यूझीलंडच्या महिला संघाला मात दिली. त्यामुळे आता भारतीय संघ २९ जानेवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी निश्चित झाला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे महिला संघ सामना खेळणार आहेत. या दोन्ही संघातून जो विजयी होईल तो संघ भारतासोबत अंतिम सामन्यात पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश
१९ वर्षाखालील महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडिया आता फायनलमध्ये पोहोचली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावून ३४ चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघाची उपकर्णधार स्वेता सेहरावतने पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .
#TeamIndia march into the Finals of the #U19T20WorldCup.
They become the first team to reach the finals of the inaugural #U19T20WorldCup 💪💥👏
Way to go #WomenInBlue! pic.twitter.com/4H0ZUpghkA
— BCCI Women (@BCCIWomen) January 27, 2023
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारताची कर्णधार शेफाली वर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाची पहिली विकेट तीन धावांवर आणि दुसरी विकेट अवघ्या पाच धावांवर पडली. संघाचे दोन्ही सलामीवीर लवकरच तंबूत परतल्याने फलंदाजांवर दडपण आले. त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. भारताकडून पार्श्वी चोप्राने सर्वाधिक ३ गडी बाद केले.
ICC U19 WOMEN’S WC. India Women U19 Won by 8 Wicket(s) https://t.co/qWR75zhcrp #INDvNZ #U19T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) January 27, 2023
न्यूझीलंडकडून मिळालेल्या १०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचीही सुरुवात तशी खराबच झाली. कारण संघाची कर्णधार शेफाली अवघ्या १० धावा करून बाद झाली. मात्र, त्यानंतर उपकर्णधार स्वेता सेहरावत आणि सौम्या तिवारी यांनी भारताच्या डावाला विजयच्या उंबरठ्यावर नेले. सौम्या २२ धावांवर खेळात असताना बाद झाली तर स्वेताने नाबाद ६१ धावांची खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला. भारताच्या पार्श्वी चोप्राने गोलंदाजीत ४ षटके टाकताना १ षटक निर्धाव टाकले तर २० धावा खर्च करून ३ गडी बाद केले. पार्श्वीच्या या दमदार कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
For her excellent bowling figures of 3/20, Parshavi Chopra is adjudged Player of the Match as #TeamIndia win by 8 wickets 🙌🙌
Scorecard – https://t.co/qWR75zhcrp #INDvNZ #U19T20WorldCup pic.twitter.com/i9ATNdkH97
— BCCI Women (@BCCIWomen) January 27, 2023