कूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना निवडणूक आयोगाने रोखलं 

नवी दिल्ली – प. बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात केंद्रीय दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात पाच जण मरण पावले. ही घटना सीतालकुची विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्र क्रमांक 126 वर घडली. या केंद्रावरील मतदान स्थगित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल विशेष निरीक्षक आणि राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्‍तांनी पाच वाजेपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.  शनिवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आयोगानं कोणत्याही नेत्यास त्याठिकाणी जाण्यास 72 तासांची बंदी घातली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्ष, निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांना टार्गेट केलं आहे. 

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी

‘सीतलकुचीमधील ग्रामस्थांवर अंधाधून गोळीबार करण्यात आला आहे. अशा परिस्थिती नेत्यांना कूचबिहारला जाण्यापासून रोखणं हे निवडणूक आयोगाचं अभूतपूर्व पाऊल आहे. सीतलकुचीला जायची माझी इच्छा आहे.’

विधानसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कुचबिहार जिल्ह्यातील माथाभंगा भागात केंद्रीय दलांनी गोळ्या घालून पाच जणांची हत्या केली. त्याचा जाब निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली आहे. ही निवडणूक सुरू झाल्यापासून 17 ते 18 जणांची हत्या करण्यात आली. त्या एक डझन कार्यकर्ते आमच्या पक्षाचे आहेत. सध्या प्रशासनाचा ताबा आमच्याकडे नाही तर निवडणूक आयोगाकडे आहे, याकडे ममता बॅनर्जी यांनी लक्ष वेधले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.