जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये महिला जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चापट मारण्याच्या वादावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून मॅडम, तुम्हाला काय वाटते? तुम्ही कार्यकर्त्यांना मारणार आणि आम्ही घरात शांत बसणार, भारत माता की जय म्हणणार्यांना चापट मारली जाईल आणि आम्ही डोळे मिटून बसू. मॅडम ही चुकी आहे.

 

अलीकडेच मध्य प्रदेशातील राजगडमध्ये कलम 144  लागू केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राजगड जिल्ह्यातील बियारा येथे मोर्चा काढला होता.

त्यावेळी जिल्हाधिकारी निधि निवेदिता उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली होती. संतप्त झालेल्या निदर्शकांनी उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा याना धक्कबुकी केली होती.  या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल झाले आहेत.

या अधिका्यांनी सीएएच्या समर्थकांना मारहाण केल्यानंतर आजचा दिवस लोकशाहीच्या काळातील काळा दिवस म्हणून गणला जाईल, असे भाजपने म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.