नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन वर्ष कार्यकाळ आणि जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उपजिल्हाधिकारी-तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तीन उपजिल्हाधिकारी तर १४ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.
रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपांडे यांची धुळे जिल्ह्यात निवडणूक उपजिल्हाधिकारी पदी बदली झाली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे डॉ. रामदास जगताप यांची नियुक्ती झाली आहे. भूसंपादन अधिकारी पल्लवी निर्मळ यांची नाशिकला भूसंपादन अधिकारीपदी बदली झाली आहे.
भूसंपादन अधिकारी जयश्री भागचंद आव्हाड यांची महसूल उपविभागीय अधिकारी, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. आव्हाड यांच्या रिक्त जागेवर मनोज देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. पुणे विभागीय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांची भूसंपादन अधिकारीपदी निवड झाली आहे.
जिल्ह्यातील तहसीलदारांच्या ही बदल्या झाल्या आहेत. नव्याने नियुक्त तहसीलदारांचे नाव, पद, कंसात सध्या कार्यरत तहसीलदारांचे नाव
योगेश शिंदे (नाशिक)- भूसुधार तहसीलदार (सुनिता जऱ्हाड), कैलास पवार (नाशिक- तहसीलदार संजय गांधी योजना (विशाल नाईकवाडे), शरद घोरपडे – सामान्य प्रशासन (शिल्पा पाटील), सिद्धार्थकुमार मोरे- अकोले (सतीश थेटे), दीपक धिवरे- व्यवस्थापक, शेती महामंडळ, राहाता (गणेश माळी),
नामदेव पाटील -राहुरी, शिल्पा पाटील- सोलापूर, माधुरी आंधळे- नाशिक, सुनिता जऱ्हाड- नाशिक, अर्चना भाकड- पागिरे- नाशिक, योगेश चंद्रे यांची जामखेडवरून नंदूरबारला बदली झाली आहे. शाम वाडकर पाथर्डीवरून नासिक, सतीश थोटे यांची अकोलेवरून पुणे, डॉ. क्षीतिजा वाघमारे यांची नाशिकवरून श्रीगोंदे तहसीलदारपदी बदली झाली आहे.