नवी दिल्ली – सध्या सगळीकडेच महिला प्रीमियर लीगची चर्चा होताना दिसत आहे. महिला प्रीमियर लीगच्या यंदाच्या सत्रातील पहिला सामना 5 मार्च रोजी नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला होता. त्यानंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमने-सामने आले होते. यावेळी या दोन संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली होती.
स्मृती मंधाना महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या एडिशनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटची ‘ब्यूटी क्वीन’ अशी देखील तिची ओळख असली तरी, आपल्या जबरदस्त खेळी साठी स्मृती मंधाना ओळखली जाते. दरम्यान, महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मांधनासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे.
ज्या प्रमाणे मुंबई इंडियन्स WPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरलीय, त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टुर्नामेंटमधून बाहेर होणारा पहिला संघ ठरणार का? ते आज समजणार आहे. WPL 2023 मध्ये आज संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना यूपी वॉरियर्स विरुद्ध होणार आहे. ही मॅच दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या सामन्याकडे लागल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ची टीम आजची मॅच हरली, तर टुर्नामेंटमध्ये त्यांच्यासाठी सर्वकाही संपून जाईल. अधिकृतपणे WPL 2023 च्या बाहेर होणारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पहिली टीम ठरेल. ही टीम आतापर्यंत 5 मॅच खेळलीय, पाचही सामन्यात त्यांचा पराभव झालाय. आता यूपी वॉरियर्स विरुद्ध सहाव्या सामन्यात त्यांना विजय मिळवावाच लागेल. त्यामुळे आजची ही मॅच त्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे.