वॉशिंग्टन- अमेरिकेत मृत्यूदंडाची पद्धती बदलण्यासाठी जस्टीस डिपार्टमेंट गांभीर्याने विचार करीत असून आता विषारी इंजेक्शनशिवाय फायरिंग स्क्वाड आणि विषारी वायूचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.
याबाबतची दुरुस्ती शुक्रवारी फेडरल रजिस्टरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये विविध राज्ये मृत्यूदंडासाठी इतर मार्गाचा वापर करू शकतील असे म्हटले आहे. सध्या अमेरिकेतील राज्ये आपापल्या राज्यातील नियमाप्रमाणे इलेक्ट्रिक चेअर, नायट्रोजन वायू अशा विविध मार्गाचा वापर करतात माविम नॉयम २४ डिसेम्बरपासून अमलात येणार आहे.
अमेरिकेत नवीन जो बायडेन हे अध्यक्ष सत्तेवर येण्यापूर्वी जस्टीस डिपार्टमेंटने ५ मृत्यूदंडाच्या शिक्षा अमलात आणण्याचे नियोजन केले असून त्यापैकी ३ मृत्यूदंडाची शिक्षा बायडेन अध्यक्षपदावर बसण्यापूर्वी ३ दिवस आधी अमलात आणल्या जाणार आहेत.
जस्टीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे फेडरल डेथ पेनल्टी ऍक्टप्रमाणे संबंधित राज्ये आपल्या नियमाप्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षा अमलात अनु शकतात.
जस्टीस डिपार्टमेंटच्या या दुरुस्तीमुळे मृत्यूदंडाच्या शिक्षेला विरोध करणाऱ्या संघटना नाराज झाल्या असून त्यांनी अमेरिकन प्रशासनावर टीका करण्यास प्रारंभ केला आहे.