१० लाख लोकांचा बळी घेतलेला रस्ता

मॉस्को- रशियाच्या अतिपूर्वेला असलेला २०१५ किलोमीटर लांबीचा कोलयम हमरस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रशियाच्या इरकुटस्‍क प्रदेशातील या रस्त्यावर पुन्हा एकदा मानवी सापळे आणि हाडे सापडली आहेत.

स्थानिक खासदार निकोलय त्रूफनोव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या रस्त्यावर सर्वत्र वाळूशिवाय हाडे आणि सापळे दिसत आहेत. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरु केली. थंडीच्या मोसमात या रस्त्ययवार बर्फ जमते आणि वाहने घसरतात म्हणून वाळूमध्ये मानवी हाडे मिसळून हा रास्ता तयार केल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्यक्षात स्टालिनच्या काळात तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची कहाणी अतिशय भयानक आहे या रस्त्याने १० लाख लोकांचा बळी घेतला असेही सांगितले जाते 1930 च्या दशकात स्‍टालिन च्या हुकूमशाही राजवटीत या रस्त्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी त्याच्या राजवटीला विरोध करणाऱ्या लोकांना ठेवण्यात आलेल्या छावणीतील मजुरांचा वापर करण्यात आला.

न्‍यूयॉर्क टाइम्‍सने दिलेल्या माहितीप्रमाणे साधारण कैदी आणि राजकीय कैदी अशा सर्वांचाच उपयोग करण्यात आला कडाक्याची थंडी आणि अस्वलांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला मरण पावलेल्या कैद्यांचे हाडांचे सापळे आणि इतर हाडे या रस्त्यात गडण्यात आले त्यामुळेच या रस्त्यात अधूनमधून हाडाचे सापळे आणि हाडे सापडत असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.