चारचाकीत जळालेल्या अवस्थेत सापडले दोघांचे मृतदेह

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पिंपरी गावात एका चारचाकी वाहनामध्ये जळालेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मयत तरुण हे 25 ते 30 वयोगटातील असून सिंधुदुर्गातील बांदा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

हे दोन्ही तरुण परिसरामध्ये फिरण्यासाठी आले असल्याचा अंदाज असून त्यांच्या मृतदेहासह जळालेली वॉग्नोर गाडी पिंपरी गावातील दरीत आढळली आहे. पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील दोन्ही मृतदेह ओळखण्यापलीकडचे असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.