मुंबई – बॉलीवूडमधील बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या “एक व्हिलन’ चित्रपटाच्या सीक्वलची अनाउंसमेंट करण्यात आली आहे. या सिक्वलमध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटणी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे “एक व्हिलन रिटन्टर्स’ असे शिर्षक असून त्याचे दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहेत. तसेच एकता कपूर आणि भूषण कुमार हे निर्मिती करणार आहेत.
या चित्रपटाच्या रिलीज डेटसह पहिले पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. “एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट ठीक एक वर्षांनी म्हणजे 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. याबाबत एकता कपूरने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत चित्रपटे अपडेट शेअर केले आहेत.
या चित्रपटाच्या अनाउंसमेंट पोस्टरवर कोणत्याही कलाकाराचे नाव किंवा चेहरा न दाखविता एक कुटिल स्माइल दाखविण्यात आली आहे. यावर “365 दिवसांनी एक व्हिलन परत येणार’ असे लिहिले आहे. एकताने ट्वीटमध्ये लिहिले की, “एका व्हिलन’ची कथा पुन्हा प्रारंभ होत आहे? 11 फेब्रुवारी 2022मध्ये जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार “एक व्हिलन रिटर्न्स’.
दरम्यान, या चित्रपटात चाहत्यांना अनेक ऍक्शन सीन अनुभवता येणार आहे. सध्या या चित्रपटात काही बदल करण्याचे काम सुरू आहे. 2014मध्ये प्रदर्शित झालेला “एक व्हिलन’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.