देश आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करतोय – नाना पटोले

वानवडीत काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पटोलेंचा भाजपावर घणाघात

हडपसर – मनुवादी विचारसरणी रुजविण्याचे काम भाजप करत असून, जीएसटी चा आनंद साजरा करत असताना, महागाई प्रचंड वाढली अन देश आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे.यास कारणीभूत असणाऱ्या भाजपला हद्दपार करा, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले याच्यां उपस्थितीत आज हडपसर व वानवडी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस अभिजित शिवरकर याच्यां जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा वानवडी येथे पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उल्हासदादा पवार, मोहन जोशी, कमल व्यवहारे, ,संजय बालगुडे, आबा बागुल,अरविद शिदें , अँड .अभय छाजेड,अविनाश बागवे,सचिन साठे, मुख्तार शेख, प्रा.शोएब इनामदार,
श्याम पांडे, मिलिंद अहिर, माजी नगरसेविका कविता शिवरकर, गणेश फुलारे, नितीन आरु, अमित घुले, स्वप्नील डांगमाळी, दिलीप तुपे, संजय डोंगरे, संजय हरपळे, प्रशांत सुरसे, विजय जाधव, शंभुशेठ जांभुळकर, दिनेश गिरमे, आमीन शेख, विजय जाधव, हसन कुरेशी, संगिता पवार, प्रकाश पवार, सुभाष सरोदे, गणेश कवडे,वैभव डांगमाळी, सुभाष बोराटे
आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

वानवडी : प्रदेश सरचिटणिस अभिजित शिवरकर याच्यां जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना नाना पटोले, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, अभिजीत शिवरकर.

नाना पटोले पुढे म्हणाले काँग्रेस जनसामांन्याचा पक्ष आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे. काँग्रेस पुन्हा घराघरात पोचविण्यासाठी कटिबद्ध असुन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आज घेतलेल्या मेळाव्यातुन व
येथे उपस्थित असणाऱ्या हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे पुणे शहरात काँग्रेस नक्कीच आघाडीवर असेल, असा विश्वास वाटतो आहे. प्रास्ताविक प्रशांतमामा तुपे व प्रदेश युवक सरचिटणिस अभिजित शिवरकर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश फुलारे यांनी केले,तर आभार विजय जाधव यांनी मानले.

काँग्रेसने आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी – बाळासाहेब शिवरकर
आज पुणे शहरात काँग्रेसची ताकद राहिली आहे. महापालिकेची सत्ताही काँग्रेसने अनेक वर्षे आपल्याकडे ठेवली आहे.त्यामुळे आत्ताही काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असले आणि पक्ष मजबुत करायचा असेल तर काँग्रेसने महापालिका निवडणुका या स्वबळावर लढविल्या पाहिजेत. अशी अपेक्षा यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केली. विविध विकासकांमाद्वारे काँग्रेसनेच पुण्याची पायाभरणी केली आहे. तेव्हा काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निरंतर कार्य करत राहु आणि पुणे शहरात सर्वाधिक काँग्रेसचे नगरसेवक हे हडपसर व वानवडी भागातून विजयी होतील यासाठी काम करत राहू,असेही शिवरकर यांनी यावेळी सांगितले.

माझे आजोबा विठ्ठलराव शिवरकर यांनी वानवडी मध्ये काँग्रेसच्या विचाराची पायाभरणी केली, बाळासाहेब शिवरकर यांनी काँग्रेस वाढविली अनेकांना पालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली असे मत माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.