नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या दिल्लीतील बांधकाम मजुरांना आप सरकारने मोठाच दिलासा दिला आहे. त्या मजुरांना प्रत्येकी 5 हजार रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीने बांधकाम मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले. दिल्लीत 23 कोरोनाबाधित आढळले आहेत. मागील 40 तासांत दिल्लीत एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. ती बाब दिल्लीसाठी दिलासादायक ठरली आहे. तसे असले तरी कोरोनाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागणार आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी दिल्लीकरांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले.