नगर – शिवसेनेच्या नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. प्रभाग क्रमांक- 6 अ’ मधील जागा रिक्त झाली असून नुकताच निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहिर केला असून अचारसंहिता लागु केले आहे.
अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी ही जागा राखीव असल्याने या जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 4 ऑक्टोबर रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झाली.
यादी प्रसिध्द झाल्यानंतर 3 जानेवारी 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या 8 व 9 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तर अंतिम मतदार याद्या 11 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे.
या जागेवर पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याच प्रभागात पोटनिवडणूक होणार असल्याने या निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार की, मनपातील भाजप-राष्ट्रवादीची युती या निवडणुकीतही कायम राहणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच प्रभागात लागू राहणार आहे. त्यामुळे प्रभागातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, अथवा घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही.