नवी दिल्ली – चीन इतर देशांच्या नागरिकांना किती महत्व देते हे एका चिनी राजदूताने दाखवून दिले आहे. चीनचे राजदूत तांग सॉन्ग यांचे लोकांच्या पाठीवरुन चालतानाचा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे चीनवर पुन्हा एकदा जगभरातून टीका करण्यात येत आहे.
प्रशांत महासागरातील किरीबाती या छोट्या बेटावर चिनी राजदूत तांग सॉन्ग यांच्या स्वागतासाठी मुले आणि पुरुष ‘रेड कार्पेट्स’ बनल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या एका राजदूताने चिनी राजदूताच्या या वर्तनावर प्रश्नचिन्ह उभे केले असून अमानुष कृत्य म्हंटले आहे.
I simply cannot imagine any scenario in which walking on the backs of children is acceptable behavior by an ambassador of any country (or any adult for that matter!) Yet here we are thanks to #China’s ambassador to Kiribati. https://t.co/HcJqfbaKzg
— Constantine Panayiotou (@CP_Suva) August 16, 2020
अमेरिकेचे नौदल अधिकारी कॉन्स्टँटाईन पनायोटौ यांनी चीनचा निषेध करत म्हटले की, मुलांच्या पाठीवरुन चालत असलेल्या एखाद्याची मी कल्पनाही करू शकत नाही.
दुसरीकडे, चीनने त्यांच्या राजदूताच्या अमानवी कृत्याला ‘संस्कृती’ असे संबोधत बचाव करण्याचा प्रयत्न केला. राजदूत तांग सॉन्ग यांनी पारंपारिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. किरीबाती लोकांच्या आणि स्थानिक सरकारच्या विनंतीमुळेच राजदूतांनी संस्कृती आणि परंपरेनुसार ३० लोकांच्या पाठीवरुन चालत गेले, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी सांगितले आहे. तसेच काही जण या घटनेचा फायदा उचलून चीन आणि किरिबाती यांचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.