चिंचवड एमआयडीसी, काळभोरनगर रस्त्यालगत सर्रास दिसते चित्र

चिंचवड – चिंचवड एमआयडीसीच्या काळभोरनगर परिसरात कचरा कुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत आहेत. भरलेल्या कचरा कुंड्या रिकाम्या केल्या जात नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने लघु उद्योजकांनी पाच गुंठे ते काहींनी एक-दोन एकराचे भूखंड खरेदी करुन उद्योग, व्यवसाय करीत आहेत. या परिसरात डॉ. बॉस्को ट्रेनिंग सेंटरमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. पॅन इंडस्ट्रीज, बेस्ट इंजिनिअरिंग, युनिक इंडस्ट्रीज आदी लघुउद्योगांमधून शेकडो कामगार काम करतात.

मोहननगर, चिंचवड स्टेशन तसेच थरमॅक्‍स चौक आदी भागाकडे जाणारा रस्ता असल्यामुळे कायम वर्दळ असते. या रस्त्यालगत महापालिकेने लघुउद्योजकांसाठी कचरा कुंडी ठेवली आहे. मात्र, आरोग्य विभागाचे कर्मचारी याठिकाणी लवकर फिरकतच नाहीत. त्यामुळे कचरा कुंड्‌या कायम कचऱ्याने वाहत असतात. कचरा कुंडीमध्ये जागा नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा फेकून देतात. वास्तविकतः लघुउद्योगांमधील सर्व प्रकारचा कचरा येथे टाकला जातो. त्यामुळे त्याची वेळीच विल्हेवाट लावण्याची गरज असतानाही महापालिकेच्या आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.