सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीनंतर 10 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा मतदार संघातून एकूण 12 उमेदवारांनी 21 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीनंतर 10 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तर शिवसेनेकडून मुख्य उमेदवार नरेंद्र पाटील- शिवसेना यांचा अर्ज स्वीकृत झाला. त्यामुळे अर्ज छाननीच्या दिवशी सौ. प्राची नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेकडून पर्यायी दाखल केलेला अर्ज नाकारण्यात आला.