पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मागील तीन लोकसभा निवडणुकीतील पुणे लोकसभेसाठी 55 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले नाही. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.
दरम्यान, मध्यंतरी एका खासगी संस्थेने मतदान न करण्याची कारणांचा शोध घेतला असता यामध्ये प्रामुख्याने खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नाही, भ्रष्टाचारामुळे राजकीय व्यवस्थेविरुद्ध चीड, उमेदवार माहिती नाही, सलग सुट्टी असल्याने बाहेर गावी जाणे, मतदान केंद्र लांब आहे, अशी कारणे मतदारांनी दिली आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्षभर मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे दिसून आले आहेत. मतदार यादीत नाव नव्हते, मतदान केंद्रांची माहिती नाही.
नोकरीनिमित्त बाहेरगावी. घरातील ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्य मतदान केंद्रावर नेण्यास टाळाटाळ करतात. प्रलोभन सांगितल्याशिवाय मतदान नाही, आजारपणामुळे जाणे शक्य नाही, मतदान केंद्राबाहेर स्थानिक गुन्हेगारी अथवा गुंड प्रवृत्तीचे लोक बुथवर बसून वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग करण्याची भीती आदी कारणे मतदान न करण्याची नागरिकांनी दिली.
पुणे लोकसभा मतदारसंघ
वर्ष – एकूण मतदार – मतदान – टक्केवारी
2009 – 18,06,953 – 7,34,641 – 40.66
2014 – 18,35,835 – 9,93,966 – 54.14
2019 – 20,75,824 – 10,35,236 – 49.87