वेल्हे -पानशेत परिसरातील करोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. वेल्हे तालुक्यातील कादवे येथील 13 जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
कादवे (ता. वाल्हे) येथील 42 वर्षीय महिलेस करोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी (दि. 23) स्पष्ट झाले होते. संबधित महिलेच्या संपर्कातील चौदा व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये तेरा जणांची चाचणी निगेटिव्ह आले. संबंधित महिलेच्या घरातील आणखी एका महिलेस करोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी (दि. 24) निष्पन्न झाले होते.
या नवीन लागण झालेल्या महिलेच्या संपर्कातील आणखी 13 जणांचे स्वॅब वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये घेतले होते. गुरुवारी (दि. 25) ते तपासणीसाठी पाठविले असता आज शुक्रवार (दि. 27) त्या 13 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, 32 रूग्ण बरे झाले आहेत.