नवी दिल्ली – देशातील कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असून काही राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. अशातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाची पथके पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. केंद्राचे हे पथक महाराष्ट्रामध्ये आधीच दाखल झाले असून आता आणखी दहा पथके विविध राज्यांतील कोरोना परिथितीचा आढावा घेण्यासाठी रवाना करण्यात येणार आहेत.
ही दहा पथके गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील कोरोनाची अधिक बाधा असलेल्या शहरांना भेटी देऊन स्थानिक प्रशासनाला मार्गदर्शन करतील.
10 Central teams comprising officials from various government departments being sent to assist State governments of Gujarat, Tamil Nadu, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Punjab, West Bengal Andhra Pradesh and Telangana. A Central has already visited Maharashtra.#COVID19
— ANI (@ANI) May 9, 2020