मुंबई – छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. नुकतंच तिने लॉकडाऊन दरम्यानचे काही व्हिडिओ आणि फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीही आपल्या पुण्यातील घरात आहे. मात्र, रेड झोनमध्ये असल्याचा प्राजक्ताला जरासाही त्रास होत नाहीये. आपल्या घरातील अंगणासमोर असलेल्या बागेत निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ता चटई घालून वेळ घालवते आहे.
लॉकडाउन काळात प्राजक्ता घरात राहून विविध उपक्रमात आपलं मन रमवत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आईकडून स्वयंपाकाचे खास धडे घेत जेवण बनवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती गमतीने म्हणाली होती की माझे वजन वाढल्यास त्याला आईचे लाड कारणीभूत असतील.
तसेच प्राजक्ता सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांसाठी योगविद्येचं मार्गदर्शन आणि आहारासंदर्भातल्या काही टिप्स सुद्धा देत आहे.
चित्रपट असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.