दोघांचा मृत्यू : पाण्यामुळे चालकाला नाल्याचा अंदाज आला नाही
पाटण – कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने अोढे नाले भरुन वाहत आहेत. याच भरुन वाहणार्या नाल्यात चालकाला अदांज न आल्याने शनिवारी रात्री कार पाण्यात वाहून गेली. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी की, कोयनानगर जवळ असलेल्या हुंबरळी (ता.पाटण) येथील पाबळनाला या ठिकाणी शनिवारी रात्री कारवरील चालकाला पाण्यामुळे अंदाज न आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटल्याने कार दोनशे फूट धबधब्यात कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
नितीन शेलार (रा.सातारा) याच्यासह अन्य एकाचा या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोयनानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी , कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.