अनंतपूर : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात सुरवात झालेली आहे. मात्र आंध्रप्रदेशात विधानसभा उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशातील अनंतरपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळले. मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना मधुसुदन यांनी अचानक ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळले या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे.
#WATCH Jana Sena MLA candidate Madhusudhan Gupta smashes an Electronic Voting Machine (EVM) at a polling booth in Gooty, in Anantapur district. He has been arrested by police. #AndhraPradesh pic.twitter.com/VoAFNdA6Jo
— ANI (@ANI) April 11, 2019