एप्रिलमध्ये मतदान शक्य ः निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर
राजगुरूनगर -राजगुरुनगर नगरपरिषदेची आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि नगरसेवक पदाचे आरक्षण पीठासन अधिकारी तथा प्रांत संजय तेली यांनी आज जाहिर केले. नगरपरिषदेच्या एप्रिल 2020मध्ये या निवडणूक होणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, प्रशासकीय अधिकारी युवराज विरंजक, अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी नरेंद्र कणसे, आदिनाथ काळाणे, सुनील निकाळजे, चारुशीला हरडे या अधिकाऱ्यांसह नगरसेवक बापू थिगळे, सारिका घुमटकर, वैशाली बारणे, सचिन मधवे, शंकर राक्षे, रफिक मोमीन, संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, मनोहर सांडभोर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना दि. 20 ते 26 फेब्रुवारीपर्यंत मतदारांनी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी यावेळी केले. आरक्षण सोडत तीन शालेय मुलींच्या हस्ते काढण्यात आले.
सन 2015 च्या आरक्षणात पूर्णतः बदल करण्यात आल्याने विद्यमान नगरसेवकांना पुन्हा कितपत संधी मिळू शकते याबाबत आता थेट निवडणुकीत कळणार आहे. कुणबीचे दाखले अनेक नगरसेवकांकडे असल्याने ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार का, हे सध्या तरी स्पष्ट नाही. आरक्षणानंतर मात्र इच्छुक उमेदवार आणि नगरसेवक यांच्यात गटागटाने चर्चा रंगली होती.
प्रभाग निहाय आरक्षण (गतवेळीचे आरक्षण)
प्रभाग 1 : सर्वसाधारण महिला (सर्वसाधारण)
प्रभाग 2 : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (सर्वसाधारण)
प्रभाग 3 : सर्वसाधारण (सर्वसाधारण महिला)
प्रभाग 4 : सर्वसाधारण (सर्वसाधारण महिला)
प्रभाग 5 : सर्वसाधारण (सर्वसाधारण महिला)
प्रभाग 6 :नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (सर्वसाधारण)
प्रभाग 7 : सर्वसाधारण महिला (सर्वसाधारण)
प्रभाग 8 : सर्वसाधारण महिला (अनुसुचित जमाती)
प्रभाग 9 : अनुसुचित जमाती महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
प्रभाग 10 : सर्वसाधारण महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
प्रभाग 11 : नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (सर्वसाधारण महिला)
प्रभाग 12 : सर्वसाधारण (अनुसुचित जाती महिला)
प्रभाग 13 : सर्वसाधारण (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
प्रभाग 14: नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (सर्वसाधारण महिला) प्रभाग 15 : सर्वसाधारण (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
प्रभाग 16: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (सर्वसाधारण)
प्रभाग 17 : सर्वसाधारण महिला (सर्वसाधारण)
प्रभाग 18 : अनुसुचित जाती (नागरिकांचा मागास प्रवर्ग)