‘या’ राज्यात वेगाने पसरतोय करोनाचा ब्रिटीश अवतार; युद्धजन्य स्थितीचे संकेत

अहमदाबाद – गुजरातमध्ये करोनाचा ब्रिटीश अवतार वेगाने पसरत आहे. त्याच्या फैलावाचा वेग आधीच्या विषाणूपेक्षा चार ते सहा पट अधिक आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचे स्वरूप युद्धापेक्षा कमी नाही, असा इशारा गुजरात सरकारच्या कृती दलाचे सदस्य डॉ.व्ही.एन.शहा यांनी दिला आहे.

करोनाच्या ब्रिटीश अवताराचा संसर्ग झाल्यास संबंधित व्यक्तीबरोबर राहणाऱ्या कुटूंबीयांनाही अल्पावधीतच त्या विषाणूची लागण होते. त्यामुळे करोनाविरोधी लढ्यात विजय मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या लढ्यात एसएमएस म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर या बाबींना अतिशय महत्व आहे. त्याशिवाय, सामूहिक प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण हा महत्वाचा घटक आहे, असे शहा यांनी नमूद केले. मागील काही दिवसांपासून गुजरातमधील करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. त्यामुळे बाधितांची दैनंदिन वाढ नवनवे उच्चांक गाठत आहे. त्या राज्यात शुक्रवारी 4 हजार 541 नवे करोनाबाधित आढळले. ती आजवरची सर्वोच्च संख्या ठरली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, शहा यांनी दिलेल्या इशाऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.