नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी ताळेबंद जाहीर केले आहेत. बहुतांश कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. शनिवारी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने जाहीर केलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठीच्या ताळेबंदातील नफा 14.36 टक्क्यांनी वाढला आहे.
या तिमाहीत बॅंकेला 8,760 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेचे व्याज उत्पन्न वाढले आहे. त्याचबरोबर ठेवीही वाढल्या असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या तिमाहीत बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.81 टक्के इतकी नोंदली गेली आहे.