दिल्ली – स्वच्छता कर्मचारी मनिष कुमार या आघाडीच्या करोना योध्याला दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसमध्ये लस देत या महत्वाकांक्षी मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले. या नंतर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना लस देण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन उपस्थित होते. निती आयोगाचे सदस्य आणि या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. व्हि. के. पॉल यांनीही ही लस घेतली.
हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले. हरदीप सिंह या स्वच्छता कर्मचाऱ्याला सर्वात आधी लस देण्यात आली. त्या पाठोपाठ इदिरा गांदी वैद्यकीय महाविद्यालयाचे वरीष्ठ अधिष्ठाता डॉ. जनक राज यांना लस देण्यात आली. राज्यात 27 केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
तेलंगणा – हैदराबाद येथील महात्मा गांधी रुग्णालयात एस. कृष्णम्मा या सफाई कर्मचाऱ्याला लस देऊन मोहिमेची सुरवात झाली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री इटला राजेंद्र, केंद्री गृहराज्य मंत्री जी कृष्णन उपस्थित होते. शनिवारी दिवसभरात 3600 जणांना लस देण्यात आली. यावेळी रुग्णालयात उत्सवी वातावरण होते. राज्यात 140 ठिकाण लिसीकरण करण्यात आले.
“मला करोना झाला. त्यानंतर माझ्या कुटुंबियांना करोना झाला. त्यामुळे मला दोनदा विलगीकरणात रहावे लागले होते. त्यामुळे मी लसीची वाट पहातच होते, असे कृष्णम्मा यांनी सांगितले.
ओडिशा – ओडिशामध्ये 30 जिल्ह्यातील 161 केंद्रावर लसीकरणाची सुरवात झाली. सफाई कर्मचारी बिरांची नाईक याला पहिल्यांदा लस टोचण्यात आली. त्यानंतर कॅपीटल रुग्णालयाचे प्रमुख डॉ. लक्ष्मीधर साहू यांना लस देण्यात आली. एकूण 16 हजार 100 कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी लस देण्याचे नियोजन केले होते. शिक्षा “ओ’ अनुसंधान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक मोहापात्रा आणि भूवनेश्वर एम्सच्या डॉ. गितांजली बाटमानबाने यांनाही लस देण्यात आली.
लेह – लेहमध्ये तैनात असणाऱ्या इंडो तिबेटीयन पोलिस दलाच्या 20 जवानांनी शनिवारी लस घेतली. या दलाने करोना विरोधातील लढ्यात छावला येथे पहिले महाकाय विलगीकरण कक्ष विक्रमी वेळेत उभारून महत्वाची कामगिरी बजावली होती. फेस मास्क आणि पिपिइर किट बनवले होते. नवी दिल्लीत उभारलेल्या जगातील सर्वात मोठे कोविड सेंटर या दलाने चालवले आहे.
गोवा – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा कर्मचारी रंगनाथ भोजी याला लस देऊन या लसीकरण मोहीमेची सुरवात राज्यात करण्यात आली. राज्यात पहिल्या दिवशी 700 जणांना लस देण्यात आली. गेल्या वर्षी उभारलेल्या करोना कक्षातील भोजी हे कर्मचारी होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात 11 हजार जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कर्नाटक – राज्यात 243 केंद्रांवर लसीकरण मोहिमेची सुरवात करण्यात आली. नागरत्न के या व्हिक्टोरिया रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पहिली लस देण्यात आली. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यावेळी उपस्थित होते. राज्यात पहिल्या दिवशी 24 हजार 300 जणांना लस देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 7 लाख 17 हजार 439 जणांना लस देण्यात येणार आहे.
काश्मिर – काश्मिरमध्ये शेरी काश्मिर वैद्यकीय शास्त्र संस्थेचे संचालक ए. जी. अहानगर आणि संस्थेच्या भोजन विभागातील पर्यवेक्षक बाशिर अहमद यांना लस देण्यात आली. या केंद्रशासित प्रदेशात 40 लसीकरण केंद्र आहेत तर काश्मिर खोऱ्यात 20 लसीकरण केंद्र आहेत. पहिल्या दिवशी लसीकरण झाल्यानंतर लस देणाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल.
आसाम – आसाममध्ये पहिल्या दिवशी 65 केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री हिमांता बिश्त शर्मा यांनी गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात या मोहिमेचे उद्घाटन केले. 33 जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन लाख 90 हजार जाणांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
बिहार – पाटण्यातील सरकारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पाच कर्मचाऱ्यांना लस देऊन मोहिमेची सुरवात करण्यात आली. मुख्यमंत्री नितीशकुमार यावेळी उपस्थित होते. बिहारमध्ये 300 केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले. ऍम्ब्युलन्स चालक राम बाबू यांना पहिला डोस देण्यात आला. पहिल्या दिवशी 30 हजार डोस देण्यात येणार होते.
त्रिपुरा – उत्तर त्रिपुरा येथील धर्मनगर जिल्हा रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी अरूणभा चक्रवर्ती यांना लसीचा पहिला डोस देऊन लसीकरण मोहिमेची सुरवात करण्यात आली. राज्यात दोन टिकाण लिसीकरण करण्यात येणअर ाहे. पहिल्या दिवशी दोनशे जणांना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात चार हजार 685 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश – राज्यात 317 केंद्रावर लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. लखनौमधील बलरामपूर रुग्णालयात मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेची सुरवात झाली.पहिल्या दिवशी एकूण तीन हजारहून अधिक जणांना लस देण्यात आली. गौतम बुध्द नगर येथळ खासदार डॉ. महेश शर्मा हे लस घेणार पहिले संसद ससदस्य ठरले.
तामिळनाडू – मदुराई येथे मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. 166 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. पहिला डोस तामिळनाडू सरकारी डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. के. सेंथील यांना पहिली लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच लाख 36 हजार जणांना लस देण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेश – विजयवाडा शासकीय रुग्णालयात मुख्यमंत्री वाय.एस. जग मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पुष्पा कुमारी या आरोग्य सेविकेला पहिली लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात तीन लाख आठ हजार जणांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, एका अरोग्य कर्मचाऱ्याला लस दिल्यानंतर भोवळ आली. त्याची सर्व तपासणी केल्यावर त्याने काही न्याहरी केली नसल्याने भोवळ आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला सलाईन देऊन वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले.
मध्य प्रदेश – मध्य प्रदेशमध्ये मुख्यंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेची सुरवात करण्यात आली. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. भोपाळमधील रुग्णालयात जाऊन त्यांनी या मोहिमेची पाहणी केली.
पंजाब – पंजाबमध्ये 59 लसीकरण केंद्रावर सुमारे 5 हजार 900 जणांना लस देण्यात आली. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या उपस्थितीत ही मोहिम सुरू करण्यात आली. अमरिंदरसिंग यांनी एक पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गरीबांना ही लस मोफत देण्याची मागणी केली आहे.