नवी दिल्ली – लॉकडाऊनमध्ये काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी दिली असली, तरी मद्य आणि वाईन दुकानांवर बंदी कायम असेल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यामुळे देशात मद्यविक्रीवर बंदी कायम असेल. राज्यासह देशभरात दारू दुकानं-वाईन शॉप सुरु ठेवण्याची मागणी केली जात होती. त्यावर केंद्राने हे स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र यावर आता केंद्रानेच स्पष्टीकरण देत, देशभरातील दारू दुकाने बंदच राहतील, असे म्हटले आहे. यामुळे वॉईन शॉप सुरू होण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.