मागासवर्गीय समाजाला आयुष्यभर विसरणार नाही – भरणे

रेडा -इंदापूर तालुक्‍यातील मागासवर्गीय समाज व दलित बांधव तसेच उपेक्षित कुटुंबांना आधार देण्यासाठी कदापि विसरणार नाही, अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

काटी (ता. इंदापूर) येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रिपब्लिकन क्रांती सेना यांच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील भरीव योगदान देणाऱ्यांना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे पुरस्काराने आमदार भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, ज्येष्ठ विधिज्ञ व सरकारी वकील ऍड. मोहम्मद तांबोळी, जैन समाज संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा (इंदापूर), “प्रभात’चे तालुका प्रतिनिधी नीलकंठ मोहिते, माध्यमिक शिक्षक पांडुरंग सपकळ, पत्रकार सागर शिंदे, पत्रकार मधुकर गलांडे यांना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरवण्यात आले.

यावेळी मोहित अचलिया, वैभव लोढा, समतावादी चळवळीचे प्रा. प्रकाश नाईक, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, राष्ट्रवादीचे युवक नेते वैभव वाघमोडे, प्रा. बाळासाहेब लोखंडे, तानाजी धोत्रे, आकाश कांबळे उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक आरडे यांनी आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×