‘नमस्कार, मी चांद्रयान-2…’

चांद्रयान -2 ने देशवासियांना दिला संदेश

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत चांद्रयान-2 ला अंतराळात पाठवले. याच चांद्रयानाचा प्रवास अत्यंत व्यवस्थित होत असून आतापर्यंत चांद्रयानाने चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे कूच केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र तत्पुर्वी चांद्रयान-2 कडून देशवासीयांना एक संदेश देण्यात आला आहे. इस्रोने आपल्या ट्‌विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.

‘नमस्कार, मी चांद्रयान-2. माझा आतापर्यंतचा प्रवास विलक्षण झाला. 7 सप्टेंबर रोजी मी दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे आणि काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा’ असे ट्‌वीट इस्रोने केले आहे. चांद्रयान-2 ने याआधी भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी यानाने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जवळपास 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून ते 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×