मुंबई – कतरिनाचे पूर्वी सलमान आणि रणबीर कपूरबरोबर रिलेशन होते. मात्र काळाच्या ओघात सगळी समिकरणे मागे पडली आहेत.
सध्या अभिनेता विकी कौशलसोबत अफेअर असल्याने अभिनेत्री कतरिना कैफ खूपच चर्चेत आहे. त्यातच कतरिनाचा नववधू वेशातील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिचं लग्न ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, कतरिनाचा एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत अभिनेत्री कतरिना नववधूच्या वेशात दिसत आहे. या वेशातील काही फोटो कतरिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले आहे. तसेच या फोटोत कतरिना सेटवर पत्ते खेळतानाही दिसत आहे. त्याबरोबर फोटोत कतरिना स्मित हास्य करताना सुंदर दिसत आहे.
फोटोंमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन अभिनेत्री कतरिना कैफसोबत डान्स करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये बॉलिवूड स्टार्ससोबत साऊथ सिनेमाचे स्टार्सही दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये एका बाजूला नागार्जुन आहे, जो लेजेंड्री अक्किनेनी नागेश्वर राव यांचा मुलगा आहे. त्यानंतर शिवराज कुमार उभा आहे, जो कन्नड सिनेमाचे लेजेंड्री आणि आयकॉनिक डॉक्टर राज कुमार यांचा मुलगा आहे. तसेच याव्यतिरिक्त तमिळ सिनेमाचे लेजेंड्री आणि आयकॉनिक अभिनेता शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभू देवा आहे
अभिनेत्री कतरिना लवकरच अक्षय कुमारबरोबर ‘सूर्यवंशी’ सिनेमात दिसणार आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचे या वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात ‘भूत-पार्ट 1: द हॉन्टेड शिप’, ‘सरदार ऊधम सिंह’ आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिकचा सामावेश आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा