Stock Market Closing Updates 8 January: आठवड्याचे पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरले. प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात जोरदार विक्री दिसून आली. बँकिंग, एफएमसीजी आणि मिडकॅप समभागांना या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 670 अंकांच्या घसरणीसह 71,355 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांच्या घसरणीसह 21,513 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग घसरले. NSE चा FMCG निर्देशांक 1000 अंकांनी घसरला आहे. निफ्टी बँक 700 हून अधिक अंकांनी घसरली. याशिवाय आयटी, ऑटो, फार्मा, मेटल, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले.
सतत वाढ होत असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये आजच्या सत्रात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 7 समभाग हिरव्या रंगात बंद झाले तर 23 समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 12 समभाग वाढीसह बंद तर 38 समभाग घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांचे नुकसान –
आजच्या व्यवहारात बाजारात विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप सुमारे 3 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे आणि ते 366.51 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 369.23 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात बाजार भांडवल 2.72 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात पॉवर ग्रिड 1.53 टक्के, एनटीपीसी 0.71 टक्के, बजाज फायनान्स 0.38 टक्के, भारती एअरटेल 0.30 टक्के, एचसीएल टेक 0.22 टक्के, लार्सन 0.22 टक्के, टाटा मोटर्स 0.19 टक्के वाढीसह बंद झाले. तर SBI 2.31 टक्के, HUL 1092 टक्के, टेक महिंद्रा 1.72 टक्के, नेस्ले 1.45 टक्के घसरणीसह बंद झाले.