एवढंच ऐकायचं बाकी होतं! “रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही”;भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या जवळपास दोन कोटींपर्यंत पोहोचत आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र संख्या काही केल्या कमी होत नाही. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराने कोरोना बरा होण्यासाठी एक अजब दावा केला आहे. “रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही” असे वादग्रस्त विधान केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडियोमध्ये भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी भर कॅमेऱ्यासमोर दावा केला आहे की, रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही असं म्हणत त्यांनी  गोमूत्र प्राशन केलं. असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना भारतासह अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू आहे.  असं असतांना भाजप आमदारांकडून गजब दवे करण्यात येत आहे. तत्पूर्वी,  आसाममधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी  विधानभवनात बोलताना असा दावा केला होता, की गोमुत्र आणि शेणामुळे  गोमुत्र आणि शेणामुळे कोरोनासारखा आजारही बरा केला जाऊ शकतो. तर “रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही”; भाजपच्या आमदाराचे वादग्रस्त विधान भाजपाचे बुलंदशहचे आमदार देवेंद्र सिंह यांनी केले होते. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.