“प्लाझ्मा डोनेशन अभियान’ एक वर्ष राबविणार

14 वर्षे रक्‍तदान शिबिर घेणाऱ्या सिद्धी फाउंडेशनचे नियोजन

बिबवेवाडी – पुणे शहरात करोनाने थैमान घातले आहे. अनेकांचे मृत्यू होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. याकरिता अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. त्यातच एक पाऊल सिद्धी फाउंडशेननेही उचलले असून पुढील एक वर्ष प्लाझ्मा डोनेशन अभियान राबविण्यात येणार आहे. याकरिता जितो पुणे, लायन्स क्‍लब गणेशखिंड, डायग्नोपिन व महावीर प्रतिष्ठान यांचे देखील सहकार्य असणार आहे.

पुणे शहरात विविध समाजोपयोगी कार्यात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहे. दरवर्षी दि. 21 मे या दिवशी फाउंडेशनकडून रक्‍तदान शिबिर आयोजित केले जाते. याद्वारे फाउंडशेनकडून आतापर्यंत हजारो बाटल्या रक्‍त संकलन करून ते विविध रुग्णालय तसेच रक्‍त पेढ्यांकडे देण्यात आले आहे.

सध्या, करोनामुळे रक्‍तापेक्षा प्लाझ्माची मागणी होत असल्याने फाउंडेशनकडून या कामावर भर दिला जात असून पुढील एक वर्षे सातत्याने प्लाझ्मा संकलित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याकरिता नीरज कांकरीया, जिनुभाई लोढा, योगेंद्र चोरडिया, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर, सुरेन्द्र बेदमुथा, सिद्धांत छाजेड, जितो पुणे युथ विंगचे गौरव नहार, प्रीतेश मुनोत, गौरव बांठिया, नीलेश दर्डा, कौशभ धोका प्रयत्नशील असून प्लाझ्मा दात्यांचा डाटा करणे सिद्धी छाजेड, लोकेश जैन, रोहन शेळके, डॉ. सिद्धेश भोंडे यांच्याकडे प्लाझ्मा दान करणाऱ्यांच्या अँटी बॉडीज टेस्ट करून घेणे त्यांना आय.एस.आय.ब्लड बॅंक नवी पेठ व पी.एस.आय. ब्लड बॅंक रास्ता पेठ या ठिकाणी प्लाझ्मादान करून घेणे तर अमित संघवी व मुकेश संघवी हे गरजुंपर्यंत प्लाझ्मा पोहचिवतील, असे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्लाझ्मा डोनेशन करून घेणे व गरजू व्यक्‍तीपर्यंत तातडीने पोहचवणे ही आताची गरज आहे. सिद्धी फाउंडेशनच्यावतीने हाच विचार करून प्लाझ्मा दान अभियान सुरू केले आहे.
– मनोज छाजेड, संस्थापक, अध्यक्ष सिद्धी फाउंडेशन

मागील 14 वर्षापासून आम्ही रक्‍तदान शिबीर आयोजीत करीत आहोत. याचा फायदा हजारो गरजुंना झाला आहे. यावर्षी प्लाझ्मादान अभियान सुरू केले आहे.
– ललीत जैन, अध्यक्ष सिद्धी फाउंडेशन

सिद्धी फाउंडेशन व रक्‍तदान हे समीकरण मागील 14 वर्षांपासून सुरू आहे. वर्षभर प्लाझ्मा डोनेशन करून घेणे सोपे काम नाही. मात्र फाउंडेशन हे शक्‍य करून दाखवेल.
– विजय भंडारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष जितो

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.