बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने “फगली’ चित्रपटातून सिनेसृष्टीत डेब्यू केले होते. या चित्रपटाला नुकतेच सहा वर्षे पूर्ण झाले आहे. हा माझा पहिला चित्रपट नेहमीच खास राहील, असे कियाराने म्हटले आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे काही फोटो कियाराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
हा फोटो शेअर करत कियाराने पोस्ट केले की, चित्रपटसृष्टीतील प्रवासाला आता सहा वर्षे झाली आहेत. माझा पहिला चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास असेल. “फगली’साठी अक्षय कुमार, अश्विनी यार्डी, के. सदानंद, मोहित मारवाह, विजेंदरसिंग, अर्फी लांबा, मंशा बहल, जिमी शेरगिल, संचिता त्रिवेदीसह संपूर्ण टीमची मी आभारी आहे.
तसेच सुरुवातीपासूनच माझ्या प्रवासाचा एक भाग राहिलेल्या सर्व चाहत्यांचे मनपूर्वक आभारी आहे. आपले प्रेम असेच सातत्याने मिळत राहो. या कॉमेडी-थ्रिलर सोशल थ्रिलरचे दिग्दर्शन कबीर सदानंद यांनी केले होते.