ठाणे – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिवसेनेला पुन्हा एक धक्का बसला आहे. म्हस्के यांनी आपले हे राजीनामा पत्र शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून दोन दिवसंपासून संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्रात जागोजागी शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचे पुतळे जाळत दगडफेक केली.
याचवेळी ठाण्यात एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्याकडून शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर काही तासानंतरच नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला.